नायगाव जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी ; शिक्षकांचे कौतुक –राहुल खोडसे

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नायगाव शाळेने निपुण चाचणी मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत सुपर निपुण शाळा हा मान मिळवला आहे. शाळेतील ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी चारही अध्ययन क्षमता मध्ये सर्वोच्च स्तर गाठल्याने ही कामगिरी शक्य झाली आहे.
या यशाबद्दल संभाजी ब्रिगेड बीडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बालासाहेब गोरे,शिक्षक श्री.कुणाल आयवळे, श्री.दत्तात्रय जाधव, संबंधित केंद्रप्रमुख तसेच सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.नायगाव शाळेची ही कामगिरी गावासाठीअभिमानास्पद असून शिक्षकांनी घेतलेले परिश्रम व विद्यार्थ्यांची मेहनत याचे हे फळ आहे.
आगामी काळात तालुक्यातील अधिकाधिक शाळांनी सुपर निपुण शाळा हा दर्जा मिळवावा,असेही राहुल खोडसे यांनी नमूद केले.तसेच केंद्रप्रमुख श्री.अण्णासाहेब जाधव (पैठण) व केंद्रीय मुख्याध्यापक श्री.गोविंद मुळे यांनीही संबंधित शाळेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.



