मराठवाड्यातील १५० हून अधिक गोशाळांचे आधारस्तंभ वर्धमान संस्कार धाम आणि राजुभाई शहा यांचे कायदेशीर व सेवाभावी कार्य कौतुकास्पद

केज/प्रतिनिधी
जीवदयेचे कार्य केवळ चारापाण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्याला कायदेशीर संरक्षणाची जोड देणारे मराठवाड्यातील सर्वात मोठे केंद्र म्हणजे मुंबईतील वर्धमान संस्कार धाम. यासंस्थेच्या माध्यमातून आ.राजुभाई शहा यांनी मराठवाड्या तील १५० पेक्षा जास्त गोशाळांना आपला आधार दिला असून, त्यांच्या निस्वार्थी कार्या मुळेच आज हजारो गोवंशाचे प्राण वाचत आहेत,” असे प्रतिपादन जय हिंद गोरक्षण गोशाळेचे उपाध्यक्ष अशोक संजिवन खेत्रे यांनी केले आहे.
कायदेशीर लढाईत खंबीर साथ गोवंशाच्या रक्षणासाठी काम करताना अनेकदा पोलीस कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागतो. अशा वेळी वर्धमान संस्कार धामची विशेष ‘लीगल टीम'(कायदेशीर गट) संपूर्ण मराठवाड्यात सक्रिय आहे.पोलीस स्टेशनच्या कारवाईत जप्त केलेल्या पशूंना मुक्त करणे आणि त्यांच्या संदर्भातील कोर्ट केसेस स्वतःच्या खर्चाने व ताकदीने लढण्याचे अत्यंत कठीण कार्य राजुभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था करत आहे. कार्यकर्त्यांना कायदेशीर कवच मिळवून देण्यात या संस्थेचा वाटा मोलाचा आहे.१५० गोशाळांना आधुनिकतेचा आधार
राजुभाई शहा हे केवळ एका संस्थेचे प्रमुख नसून,ते मराठवाड्यातील १५० हून अधिक गोशाळांचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहेत.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जय हिंद गोरक्षण गोशाळा (कानडी माळी) येथेही त्यांनी भव्य निवारा शेड, चारा गोडाऊन,कडबा कुट्टी मशीन आणि आजारी गाईंसाठी वेटलिफ्टिंग मशीन अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
व्यक्तीपेक्षा कार्याला प्राधान्य माझ्या पेक्षा संस्थेचे कार्य मोठे आहे,ही राजुभाईंची नम्र भूमिका त्यांच्या कार्याची उंची वाढवते.प्रसिद्धीचा कोणताही हव्यास न ठेवता,जीवदयेची चळवळ कायदेशीर आणि भौतिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहिले आहे.त्यांच्या या कार्यामुळेच ग्रामीण भागातील गोशाळा कार्यकर्त्यांना निर्भयपणे काम करण्याचे बळ मिळत असल्याचे संजीवन खेत्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.



