सामाजिक

आनंदगांव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जर्मन टेक्नॉलीजी मशीनच्या साहय्याने मोफत आरोग्य तपासनी शिबीर संपन्न.

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड च्या वाचन कक्षात दिनांक २४ -फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ५ या वेळात प्रिस्टाईन आयुर इंडिया चॅरिटी फाउंडेशन, व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव ता. केज जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जर्मन टेक्नॉलॉजी मशिनच्या साहाय्याने मोफत आरोग्य तपासनी शिबीर व तज्ञांचे मागदर्शन कार्यक्रम घेण्यात आली.डॉ. प्रविण बढे यांच्या मार्गदर्शना खाली व डॉ. राजेंद्र बळे, डॉ. राहुल शिंदे परमेश्वर भवर, मधुकर भाकरेमामा, सचिन शिंदे यांनी मोफत आरोग्य तपासनी करून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजक व कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे व ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य, डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साहाय्याने मोफत आरोग्य तपासनी शिबीर घेण्यात आले. ५० लोकांची तपासनी सकाळी १० ते ५ या वेळात यशस्वीरित्या पूर्ण झाले.

तज्ञ टिमचे स्वागत माजी सरपंच रामराजे गायकवाड, माजी सरपंच ज्ञानोबा भोगजकर, गणपत गायकवाड, मच्छिंद्र पुरी, रविंद्र गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, आनंद भैय्या गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आले.शेवटी अध्यक्षीय समारोप व आभारही डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी मानले. या शिबीराचा महिला – पुरुषांनी सहभागी होऊन लाभ घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!