सामाजिक

नगरपंचायतच्या बोअरवर एकाचाच कब्जा,अन्य रहिवाशी पाण्याविना नगरपंचायत ला माहीत असूनही होत आहे डोळेझाक

केज/प्रतिनिधी

केज शहरातील प्रभाग पाच मधील अहिल्यादेवी नगर, अंगणवाडी शेजारी असलेले नगर पंचायतचे बोअरवेल वरील हातपंप काढुन स्वतःची मोटार टाकुन अतिक्रमण केले. त्यावर नगरपंचायतचीच लाईट वापरुन सदरील बोअरवेल स्वतः साठीच वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असताना ही नगरपंचायत मात्र कसल्याच प्रकारची कारवाई करत नाही.

केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,केज शहरातील प्रभाग पाच मधील अहिल्यादेवी नगर,गणेश नगर भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या आहे. त्यासाठी मागच्या कांहीं वर्षांपूर्वी अहिल्यादेवी नगर येथे अंगणवाडी शेजारी नगर पंचायत मार्फत बोअरवेल घेतलेले असुन त्यावर हातपंप बसवलेला होता.

सदरील हातपंपावरुन वार्ड क्र.५ मधील नागरीकांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला होता.मात्र अंबादास गणपत गायके,सुभाष गणपत गायके यांनी त्याचे घराचे बांधकाम चालु केल्याने त्यांनी सदरील बोअरवेलवरील हातपंप काढला व त्यावर त्यांनी स्वतः ची मोटार टाकली.एवढेच नव्हे तर सदरील प्रभागाचे नगरसेवक पुत्र हे स्वतः हजर होते.त्यावेळी त्यांनी सर्वांनाच पाणी मिळेल असे सांगुन हातपंप काढुन टाकला.त्यावर विद्युतमोटार बसवल्या नंतर ६ ते ८ महिने आम्हा नागरीकांना पाणी मिळाले.नंतर मात्र पाणी देण्यास अंबादास गणपत गायके व सुभाष गणपत गायके हे पाणी देण्यास मनाई करु लागले.

पाणी आणण्यास गेल्यावर तेथे सदरील व्यक्ती त्यांच्या घरच्या महिलांना पुढे घालुन शिवीगाळ करु लागल्या व अंगावर येऊ लागल्या त्यामुळे सदरील बोअरवलवर पाण्यासाठी जाणे म्हणजे शिव्या खाण्यासाठी जाणे असे झाले.असे करुन सदरील बोअरवेलवर त्यांनी पुर्णपणे अतिक्रमण केलेले असुन सध्या त्याचा वापर त्यांच्या बांधकामासाठीच आहे. सदरील नगरपंचायतचे बोअरवेल वरील झालेले अतिक्रमण काढुन सदरील बोअरवेल वरुन आम्हाला पाणी मिळण्या साठी तात्काळ व्यवस्था करावी.जेणे करुन आम्हा नागरीकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल व भांडण किरकिरी होणार नाहीत.

अन्यथा आम्हा सर्व रहिवाशांना नगरपंचायत समोर ठिय्या आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर अंकुश गाढवे,किस्किंदा झेंडे,ज्योतिराम झेंडे, अरुणा गाढवे,योगीराज गाढवे,वैजनाथ गाढवे, रंजना गाढवे, अनिता गाढवे,शारदा काळे, नामदेव गाढवे,राहुल रोडे,आदित्य गाढवे यांच्यासह प्रभाग पाच मधील अन्य रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदरील प्रकरणी मुख्याधिकारी अजित धोपे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!