एलआयसी विमा सखी रजनी गायकवाड यांचा गोल्ड मेडल देऊन गौरव

केज/प्रतिनिधी
भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी च्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विमा सखी सौ.रजनी लिंबराज गायकवाड यांना अंबाजोगाई येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालय येथे नुकतेच गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष स्पर्धे अंतर्गत त्यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
यशाचे मानकरी आणि पुरस्कार वितरण एलआयसी च्या विभागीय कार्यालया मार्फत आयोजित या स्पर्धेत सौ.रजनी लिंबराज गायकवाड यांनी आपल्या उल्लेखनीय कामाच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले.त्यांना बक्षीस स्वरूपात सन्मानचिन्ह आणि गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री.एच.डी.मासाळ साहेब वरिष्ठ शाखा व्यवस्थापक,मुख्य कार्यालय अंबाजोगाई, श्री.प्रमोद पाटील साहेब शाखा व्यवस्थापक,सेल्स अंबाजोगाई,श्री.गोविंद तोडकर विकास अधिकारी,एस बी ए अंबाजोगाई हे उपस्थित होते.
उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक
विमा क्षेत्रात त्यांनी दाखवलेले सातत्य आणि एलआयसी च्या कामाबद्दलची त्यांची निष्ठा यामुळेच त्यांना हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या यायशामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. विमा क्षेत्रात महिलाही आपली स्वतंत्र ओळख कशी निर्माण करू शकतात,याचे एक उत्तम उदाहरण सौ.रजनी गायकवाड यांनी घालून दिले आहे.



