सामाजिक

दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक २०२५ केज शहरात खासदार बजरंग सोनवणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

केज/प्रतिनिधी

दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.या निवडणुकीत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केज शहरातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीसाठी एकूण १७ जागांसाठी ७१ अर्ज दाखल झाले होते.त्यापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित १३ जागांसाठी आज मतदान पार पडले.

महिला प्रवर्गातील दोन जागांवर माजीखासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि माधुरी योगेश मेनकुदळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रा. विनोद जगतकर आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अनिल तांदळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

उर्वरित १३ जागांसाठी आज सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील विविध राजकीय गटांचे लक्ष लागले होते,कारण ही निवडणूक स्थानिक राजकारणात महत्त्वाची मानली जाते.या निवडणुकीत 37.5 टक्के मतदान झाले असून मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.

मतमोजणी दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्या पासून सुरू होणार आहे.या निवडणुकीचे निकाल स्थानिक राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!