शैक्षणिकसामाजिक

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कविता गित्ते- कराड यांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड

केज/प्रतिनिधी

साने गुरुजी निवासी विद्यालय केज या संकुलाच्या डॉ.कविता गित्ते-कराड मॕडम यांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड झालेली आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या उत्तम दर्जाच्या शिक्षकांची बँक तयार करण्यासाठी राज्यामध्ये शिक्षक शोध प्रक्रिया राबवण्यात आली होती जिल्हा स्तरावरून सर्व तालुकास्तरीय याद्यांची पडताळणी करून राज्यस्तरासाठी जिल्ह्यातील दहा सर्वोत्तम शिक्षकांची यादी गुणांकनांसह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठवण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे कार्यवाही करून राज्यस्तरावर ३३२ नामांकने प्राप्त झाली.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांचे आयडॉल शिक्षक म्हणून ओळख निर्माण झाली आहे या शिक्षकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग करून संपूर्ण शिक्षण विभागाला करून देणे ही काळाची गरज आहे.त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर निवड झालेल्या शिक्षकांना राज्य,जिल्हा आणि तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणे कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये या शिक्षकांचा प्रामुख्याने सहभाग घेतला जाणार असून त्यांना आवश्यकते नुसार तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.

त्यांच्या नावीन्यपूर्ण व दर्जेदार गुणवत्तापूर्ण केलेल्या कामाचे चित्रीकरण,दस्त, अभिलेख,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे वेळोवेळी उदाहरणार्थ ऑडिओ,व्हिडिओ टेक्स्ट तयार करणे व संकेत स्थळावर प्रकाशित करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे हे करणार आहेत.शिक्षण परिषदां मध्ये आयडॉल शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण व विशेष कार्याचा प्रचार प्रसार करून त्यांचे उद्बोधन ठेवण्यात येणार आहे.तसेच आयडॉल शिक्षकांना विविध समित्यांच्या बैठकांमध्ये सन्मान करून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा बैठकीत तालुका,जिल्हा, विभाग स्तरावरील विद्यार्थी गुणवत्तेच्या विविध समित्यांमध्ये त्यांच्या कामाचा उपयोग करण्यात येणार आहे. एकंदरीत त्यांच्या गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक कार्यात करून घेतला जाणार आहे.

या निवडी बद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाईचे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे सर गटशिक्षणाधिकारी, कार्यालयाचे गटशिक्षण अधिकारी श्री.सुनील केंद्रे सर,वरिष्ठअधिव्याख्याता डॉ.गिरी मॅडम, डॉ.जयपाल कांबळे सर डॉ.सुरवसे सर,डॉ.गोरे सर, डॉ. देशमुख सर ज्येष्ठ शिक्षण विस्तारअधिकारी दत्ता आबा चाटे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. उद्धवराव कराड साहेब, उपाध्यक्ष राजेश कापसे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच साने गुरुजी निवासी विद्यालयास नुकताच SQAAF अ+ प्राप्त झाला आहे.सदर शाळा जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर उपक्रम शील शाळा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावारूपाला येत आहे यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!