जिवाचीवाडी येथील पोलीस पाटील पदी श्रीमती शिवकन्या चौरे यांची निवड

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे डॉ.श्रीमती शिवकन्या विक्रम चौरे-चोले यांची पोलीस पाटील पदी निवड झाल्याने जिवाची वाडी ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दि.१७ मार्च रोजी सकाळी हनुमान मंदिर येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या १३ वर्षापासुन जिवाचीवाडी येथील तत्कालीन पोलीस पाटील यांचे दिर्घ आजाराने निधन झाल्या मुळे पोलीस पाटील पद हे रिक्त होते.
शासनभरती प्रक्रिया सुरू होऊन अर्ज मागविण्यात आले,लेखी परीक्षा व तोंडी मुलाखती घेन्यात आल्याने डॉ. शिवकन्या विक्रम चौरे – चोले यांनी यश मिळविले त्यांची पोलिस पाटील पदावर निवड झाल्या बद्दल जिवाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले व कायदा व सुव्यवस्था राखण्या साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.



