सामाजिक

अविनाश मुडेगांवकर यांना सुवर्णरत्न पत्रकारिता पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई/प्रतिनिधी

संकल्प विद्या प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा सुवर्ण रत्न पत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाई येथील दै. लोकमतचे तालुका प्रतिनिधी अविनाश मुडेगांवकर यांना जाहीर झाला आहे.संकल्प विद्या प्रतिष्ठान ही शिक्षणक्षेत्रात विशिष्ट ध्येयाने कार्य करणारी संस्था असून या संस्थेच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासुन विविध क्षेत्रातील मान्यवरांना सुवर्ण रत्न पुरस्कार प्रदान केले जातात.या वर्षी सुवर्ण रत्न पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमत चे अंबाजोगाई येथील प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर यांना जाहीर झाला आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत हा सुवर्णरत्न पुरस्कार वितरण सोहळा २८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रेखा बडे,सचिव कैलास चोले यांनी सांगितले.अविनाश मुडेगांवकर हे बऱ्याच वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेतील कै.अनंतराव भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार,स.मा.गर्गे पत्रकारिता पुरस्कार या मोठया पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. दै.लोकमत मधील अनेक सन्मानाचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत.

अविनाश मुडेगांवकर यांच्या पत्रकारितेची सुरुवात दै. सर्वसाक्षी पासुन झाली.पुढे त्यांनी दै.अजिंठा, दै.विवेकसिंधु , गांवकरी,सोलापुर तरुण भारत व लोकमत असा त्यांचा प्रवास राहिला. गेल्या २० वर्षांपासून लोकमत या अग्रगण्य दैनिकामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.शिवाय सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक,सांस्कृतिक कार्यातही त्यांचा हिरीरीने पुढाकार असतो.अविनाश मुडेगांवकर यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!