सामाजिक

एसआरटी परिसरातील बीओआयचे एटीएम कायम बंद; रुग्ण व नातेवाईकांना मोठा मनस्ताप,मशीन तात्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी

अंबाजोगाई/प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ (एसआरटी) रुग्णालय परिसरातील बँक ऑफ इंडिया (बीओआय)चे एटीएम मशीन गेल्या काही दिवसांपासून सतत बंद अवस्थेत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामनाकरावा लागत आहे.रुग्णालयात दाखल असलेल्या पेशंट च्या नातेवाईकांना औषधे, तपासण्या व इतर तातडीच्या खर्चासाठी रोखरकमेची आवश्यकता असते.मात्र एटीएम बंद असल्यामुळे त्यांना शहरात इतरत्र जाऊन पैसे काढावे लागत असून वेळ व पैशांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना याचा अधिक फटका बसत आहे.

अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ रोख रक्कम आवश्यक असताना एटीएम बंद असल्याने नातेवाईकांची धावपळ होत आहे.त्यामुळे रुग्ण सेवेवरही अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर बीओआय बँक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन एटीएम मशीन नियमित सुरू ठेवावे व योग्य देखभाल करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!