सामाजिक

मुलभूत सुविधा पासुन वंचित असलेल्या शिक्षक काॕलनी दत्त गृहनिर्माण सोसायटीतीलसभासद यांचा पुढाकार,त्रस्त रहिवाशांनी स्वखर्चातून बनवला ३० फुटी रस्ता

केज/प्रतिनिधी

केज येथील बीड रोड ते उमरी रोडला जोडणाऱ्या शिक्षक कॉलनी मधील रस्त्याच्या दुरवस्थेकडे नगरपंचायत प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने, अखेर श्री दत्त गृहनिर्माण संस्थेतील सभासदांनी एकत्र येत पदरमोड करून रस्ता तयार केला आहे. प्रशासनाच्या ‘जाग’ येण्याची वाट न पाहता नागरिकांनी दाखवलेल्या या एकजुटीची शहरात मोठी चर्चा होत आहे.

महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी रस्ता अखेर खुला झाला. 

शिक्षक कॉलनीतील एम. डी.घुले सर,पिंटू भैया तांदळे,अरूण बप्पा धस सर,नारायण घुले,संदीप भुतडा,सुर्यवंशी सर, धनराज शिंपले सर, पञकार प्रकाश मुंडे, अंधारे सर,अजित धिवार, चौरे सर ते उमरी रोड या भागाला जोडणारा ३० फुटी रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.पाच सोसायटींचा हा परिसर एन.ए,लेआउट मान्यता प्राप्त असतानाही रस्ते आणि मूलभूत सुविधां पासून वंचित होता.या रस्त्याअभावी शाळकरी मुले,स्कूल बस,मोठी व लहान वाहने आणि स्थानिक रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

यांनी घेतले पुढाकार

नगरपंचायतीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सोसायटीतील जागरूक सभासदांनी स्वतः पुढाकार घेतला. यामध्ये प्रा.ईश्वर मुंडे, अंधारे सर,कराड साहेब, काकड सर,स्वामी साहेब, धिवार साहेब,पत्रकार प्रकाश मुंडे,अशोक बडे सर व इतर सभासदांनी आर्थिक योगदान देऊन हा रस्ता तयार केला.यामुळे याभागातील दळणवळणा चा मोठा प्रश्न सुटला असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महसूल देऊनही सुविधा शून्य

या भागातील सर्वे नंबर १८/३ व १८/२ हे क्षेत्र जिल्हाधिकारी मान्यता प्राप्त अकृषीक (N.A.) क्षेत्र आहे.येथील प्लॉट धारकांनी नोंदणीच्या (Registry) माध्यमातून शासनाकडे मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला आहे.तरीही नगरपंचायत प्रशासना कडून या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

प्रमुख समस्या ज्यांच्या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.अद्याप पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही,सांडपाणी उपसा, कागदावर रस्ते आणि नाल्या असूनही प्रत्यक्षात त्या बनवलेल्या नाहीत.अनेक ठिकाणी अद्याप विजेचे खांब किंवा लाईन पोहोचलेली नाही.

प्रशासनाला नागरिकांचा सवाल आम्ही नियमा नुसार सर्व कर आणि महसूल भरतो,मग मूलभूत सुविधांसाठी आम्हाला स्वतःचा खिसा का रिकामा करावा लागतो? असा संतप्त सवाल रहिवाशांनी विचारला आहे. प्रशासनाने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे आणि या भागातील रस्ते,नाल्या आणि वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!