सामाजिक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय 

मुंबई/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे यंदा दि.९ फेब्रुवारी रोजी मी वाढदिवस साजरा करणार नाही.या दिवशी कार्यकर्ते,पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नयेत, तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये,अशी माझी नम्र विनंती आहे.असे त्यांनी म्हटले आहे.

अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे.अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात मी आणि संपूर्ण शिवसेना सहभागी आहे.असे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधुन जनतेला संदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!