शैक्षणिकसामाजिक

आमची शाळा,आमचा अभिमान केजची जिल्हा परिषद शाळा वाचवण्या साठी संपूर्ण शहर एकवटले ; प्रजासत्ताक दिनी हजारो माजी विद्यार्थ्यांचा एल्गार !

केज/प्रतिनिधी

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या केजशहरातील जिल्हा परिषद शाळेचा वैभवशाली वारसा जतन करण्यासाठी आणि ही शाळा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अवघे केज शहर एकवटल्याचे अभूतपूर्व चित्र प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळाले.शाळा वाचवा,शिक्षण वाचवा असा नारा देत हजारो माजी विद्यार्थी,अधिकारी आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते.

अभूतपूर्व सोहळा आणि ‘प्रभात फेरी’

२६ जानेवारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या जनआंदोलनात केवळ माजी विद्यार्थीच नव्हे,तर या शाळेतून शिक्षण घेणारे आजी-माजी शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य ‘प्रभात फेरी’ने संपूर्ण केज शहराचे वातावरण दणाणून सोडले होते. हातात फलक आणि मुखात शाळेप्रती अभिमान अशा जोशपूर्ण वातावरणात ही फेरी पार पडली.

पहिल्याच दिवशी ८नवीन प्रवेश,मोहिमेला मोठे यश

या आंदोलनाचे यश केवळ गर्दीपुरते मर्यादित राहिले नाही,तर प्रत्यक्ष कृतीतूनही दिसून आले. माजी विद्यार्थ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी ८नवीन विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश निश्चित केला.आपल्या शाळेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या या प्रयत्नांना पहिल्याच टप्प्यात यश मिळाल्याने उपस्थित सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता.

वैशिष्ट्ये आणि उपस्थिती

लोकसहभाग एक हजारांपेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती.प्रशासकीय बळ:उच्च पदावर कार्यरतअसलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.नियोजन संयोजकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी नियोजन करून उपक्रमाची उंची वाढवली.

ही शाळा केवळ इमारत नसून आमचे संस्कार केंद्र आहे.तिला पुन्हा उभारी देणे हे आमचे कर्तव्य आहे अशा भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी सुरू झालेली ही चळवळ आता केज तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून,या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शाळेला लवकरच सोन्याचे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!