क्रिडाशैक्षणिक

नांदूर फाटा येथील आदर्श मतिमंद विद्यालयाचे यश 

बीड/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथे दिव्यांग मुलांमुलींची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खिंडकर यशराज हरिश्चंद्र या दिव्यांग विद्यार्थ्याने गोळा फेक व १०० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. या वेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती प्रिया राणी पाटील व वै.स.का.नखाते यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तांदळे व क्रीडाशिक्षक फारुकी हे उपस्थित होते.

तसेच शाळेवरही हरिओम शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श मतिमंद निवासी विद्यालयाचे अध्यक्ष व सचिव आदिनाथ सुर्वे व विजयकुमार सुर्वे यांच्या हस्ते विद्यार्थी यांचा व कला शिक्षक फारूकी मुख्याध्यापक सुरेश तांदळे यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!