सामाजिक

कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी केज येथे पाच तास चक्काजाम आंदोलन,आंदोलकानी पाच बस फोडल्या.

केज/प्रतिनिधी

दि.१४ ऑक्टोंबर २०२५ मंगळवार रोजी केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा व इतर मागण्या साठी राजश्री राठोड उमरे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला मंगळवारी 12 दिवस झाले.तरीही प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली नाही. म्हणुन धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे नेते बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारीं १२-३० ते सायंकाळी ५-०० वाजण्याच्या दरम्यान तब्बल साडे चार तासा नंतर उप विभागीय अधिकारी दीपक वजाळे यांना आंदोलन कर्त्यांनी मागण्याचे निवेदन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

कोरडेवाडी येथून ट्रॅक्टर,पिकअप,जीप कार,मोटार सायकल, अशा विविध वाहनातून आंदोलन करणारे केजला आले होते.मंगळवारी दुपारीं १२-३० वाजता केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले.आंदोलक रस्त्यावर बसल्यामुळे येणाऱ्या वाहनांच्या तीन – चार किलोमीटर रांगा लागल्या होत्या.शहरात येणारे चारही रस्ते चक्काजाम केले होते.

रास्ता रोको दरम्यान आंदोलकांनी बसवर दगडफेक करून बस फोडल्याच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच बसेस या केज बस स्थानकात पोलीस बंदोबस्तात थांबविण्यात आल्या होत्या.आवारे पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता तर एकाने विषारी औषध घेतले होते.

आंदोलनामध्ये शहरातील व गावातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक,महिला, मुले,मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान पाच तास प्रवाशी ताटकळत थांबले होते तर महिला व लहान मुलांची परवड होत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!