सामाजिक

केज तालुक्यात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे जयंती उत्साहात संपन्न ; सामाजिक उपक्रमांचा व्यापक ठसा

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती विविध सामाजिक, शैक्षणिक व लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.केज तालुक्यातील शाळा, ग्रामपंचायती,वसाहती, सामाजिक संस्था आणि युवक संघटनांनी मुंडे साहेबांच्या विचारांना कृतीची जोड देत रक्तदान, शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान,ब्लँकेट वाटप तसेच स्मृतीस्थळउभारणी सारखे उपक्रम राबवले.

टाकळी आश्रम शाळेत प्रेरणादायी कार्यक्रम 

प्राथमिक निवासी आश्रम शाळा,टाकळी येथे दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.संस्थेच्या सचिव श्रीमती काशिबाई नारायणराव घुले यांच्या हस्ते हा सन्मान पार पडला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोगतांतून मुंडे साहेबांचे साधेपण, जनसेवा आणि नेतृत्वगुण अधोरेखित झाले.संस्थेचे उपाध्यक्ष शंकर घुले, मुख्याध्यापक ए.एन.घुले, श्रीकांत घुले यांच्यासह शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

गोपीनाथगडावर राज्य भरातून अभिवादन 

परळी वैजनाथ येथील गोपीनाथगडावर जयंती निमित्त अलोट गर्दी उसळली.ना.पंकजाताई मुंडे,डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.धनंजय मुंडे यांच्यासह मुंडे परिवाराने समाधीचे दर्शन घेतले. ‘वंचित-पीडितांसाठीच गोपीनाथगडाची निर्मिती’ असल्याचे सांगत ना. पंकजाताई यांनी मुंडे साहेबांच्या लोकसेवेचा आदर्श पुढे नेण्याचानिर्धार व्यक्त केला.रक्तदान शिबिरे,अन्नदान,गरजूंना मदत,भजन सेवा अशा विविध उपक्रमांनी परिसर भारावून गेला.

गप्पेवाडी–नामेवाडी येथे अनोखा उपक्रम 

गप्पेवाडी–नामेवाडी येथे सरपंच बाळासाहेब केदार यांच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शालेय गणवेश, टिफिन बॅग व खाऊ वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्व.मुंडे साहेबांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.पंचक्रोशी तील ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केज शिक्षक कॉलनीत ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक’: केज येथील शिक्षक कॉलनी,बीड रोड येथे मुंडे साहेबांच्या नावाने चौकाचे लोकार्पण करण्यात आले.स्थानिक युवक व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वी ठरला.या चौका मुळे मुंडे साहेबांच्या स्मृतीला कायमस्वरूपी उजाळा मिळेल,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

रक्तदानातून सामाजिक बांधिलकी 

जीवन विकास शिक्षण मंडळ,केज यांच्या वतीने स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे ७६ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ४२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.गेली तीन दशके अखंड सुरू असलेली ही परंपरा समाजोपयोगी ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

येवता येथे रक्तदान व शैक्षणिक साहित्य वाटप 

येवता येथे आयोजित रक्तदान शिबिर व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी विष्णू भाऊ घुले यांच्या समाजकार्याचे कौतुक केले.युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.शिक्षण व आरोग्याच्या माध्यमा तून शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

केज तालुक्यात विविध ठिकाणी साजरी झालेली लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती हीकेवळ स्मरणदिन न राहता ‘सेवेला कृतीची जोड’ देणारा व्यापक सामाजिक उपक्रम ठरली.रक्तदान, शिक्षण,मदतकार्य आणि स्मृतीस्थळांच्या माध्यमातून मुंडे साहेबांचा लोकाभिमुख वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सर्वत्र दिसून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!