सामाजिक

साबला येथे माजी सैनिक कै.आश्रुबा चंद्रभान काकडे यांचा ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आजी माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील साबला येथे माजी सैनिक कै. आश्रुबा चंद्रभान काकडे (माजी सैनिक) यांच्या ७ व्या पुण्यस्मरणा निमित्त आजी–माजी सैनिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन दि.२३जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या श्रद्धेने व उत्साहात संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास केज तालुक्यातील आजी माजी सैनिक,पत्रकार बांधव, नागरिक,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.

या वेळी देशसेवे साठी योगदान दिलेल्या आजी–माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आदर्श सरपंच व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मार्गदर्शक श्री.भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कै. आश्रुबा काकडे यांचे चिरंजीव श्री.विलास आश्रुबा काकडे, श्री. दत्तकुमार आश्रुबा काकडे व समस्त काकडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभणार आहे.तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काकडे परिवार व साबला ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!