गुन्हेगारीसामाजिक

लग्नासाठी जबरदस्ती आणि ॲट्रॉसिटीची धमकी ; तरूणाची केज येथे आत्महत्या,तरुणी विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी

लग्न न केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन सतत मानसिक छळ केल्यामुळे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज येथे घडली आहे.या प्रकरणी केज पोलिसांनी संशयित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,अन्वर दिलावर शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.पूजा गालफाडे नामक तरुणी माझ्याशी लग्न कर,नाहीतर तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देऊन अन्वर यांचा सतत मानसिक छळ करत होती.तिच्या सततच्या धमक्यांमुळे अन्वर हे प्रचंड मानसिक तणावा खाली होते.

खिडकीतून पाहिल्यावर घटना उघड

मुलांना शाळेला सुट्टी लागली असल्याने अन्वर यांनी दि.१६ मे रोजी आपल्या पत्नीला (हिना) अहिल्यानगर येथील बहिणीकडे सोडले होते. आणि ते स्वतः केज येथील घरी परत आले होते.दि.१८ मे रोजी सकाळी हिना यांनी पती अन्वर यांना फोन केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.फोन लागत नसल्याने घाबरलेल्या हिना यांनी आपल्या सासऱ्यांना दिलावर शेख यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. सासऱ्यांनी केज येथील घरी जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले असता,अन्वर यांनी छताच्या पंख्याला कापडी शॉलने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

पूजा गालफाडे हिच्या सततच्या धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळूनच अन्वर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.याप्रकरणी केज पोलिसांनी आरोपी पूजा गालफाडे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक उमेश निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!