
केज/प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक १९ जानेवारी २०२५रोजी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी व्याख्यान व ग्रंथ प्रदर्शन घेवून साजरी करण्यात आली.सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर एस.के.वैरागे यांचे थोडक्यात व्याख्यान घेण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रा.पं. सदस्य रमेशराव गायकवाड,रमेश शेषेराव गायकवाड यशराज जाधव,शिवराज जाधव यांची उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.अध्यक्षीय समारोप करताना महाराणा प्रताप हे शौर्य व पराक्रमाचे प्रतिक होत असेप्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.
त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाला मोठ्या संख्येने वाचक, हितचिंतक, विद्यार्थी, युवक,जेष्ठ नागरीक यांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



