प्रशासकीयसामाजिक

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यां विरोधात पंचायत समितीत खुर्चीला हार,वंचित बहुजन आघाडी आक्रमक ;उशिरा येणे,गैरहजेरी आणि सही करून पलायन

केज/प्रतिनिधी

केज पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थिती विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी यांना निवेदनदेण्यात आले असून,कार्यालयातील गैरशिस्तीचा निषेध म्हणून अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,पंचायत समितीतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत.काही कर्मचारी सातत्यानेउशिरा येतात,तर काही पूर्णतः गैरहजर राहत असल्याचे प्रकार घडत आहेत.तसेच काही कर्मचारी फक्त एकदाच येऊन हजेरी रजिस्टरवर सही करून उपस्थिती दाखवून पुन्हा कार्यालयातून निघून जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकारामुळे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत.नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कार्यालयातील शिस्त,वेळेचे पालन व जबाबदारी यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

या अनियमिततेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवण्यात आला. पंचायतसमिती कार्यालया तील सर्व विभागांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सक्तीने लागू करावी, बायोमेट्रिक शिवाय कोणतीही उपस्थिती ग्राह्य धरू नये,वेळेचे पालन न करणाऱ्या व गैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगा ची कारवाई करावी,तसेच गटविकास अधिकारी यांचे ड्युटी शेड्युल कार्यालयाबाहेर वार नुसार प्रदर्शित करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, सदर मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!