पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे कार्य कर्तृत्व,नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम होय – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक ३१ मे २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती ग्रंथप्रदर्शन,परिसंवाद, व्याख्यान,वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरी करण्यात आली.सकाळी ८ ते ४ या वेळात विविधसांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.सर्वप्रथम सकाळी ८ वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.
सकाळी ८ ते ४ या वेळेत अहिल्याबाई होळकर यांच्यावर लिहिलेल्या सर्व साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ ते १० यावेळेत कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. कथाकथन स्पर्धेत प्रथम आनंद गायकवाड,द्वितीय शिवानी भगत हे विजयी झाले.त्यानंतर १० ते ११ या वेळेत जेष्ठविचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कार्यकर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व या विषयावर व्याख्यान झाले.११ ते १२ या वेळात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.वक्तृत्व सर्धेत प्रथम गौरी ज्ञानेश्वर गायकवाड, द्वितीय अजिंक्य श्रीकृष्ण तट विजयी झाले.१२ ते १ या वेळात परिसंवाद घेण्यात आला.
परिसंवादात एस.के. वैरागे,रामराजे गायकवाड,रावसाहेब जाधव,दिगांबर गायकवाड यांनी सहभागी होवून मार्गदर्शन केले.वक्तृत्व स्पर्धा व कथाकथन स्पर्धेचे परिक्षक म्हणून बागसाहेब गायकवाड यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांना प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
या विविध कार्यक्रमात माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव, दिगांबर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, एस.के.वैरागे,गौरी गायकवाड,कृष्णराजे गायकवाड,स्वरूप पानढवळे,लक्ष्मी पुंड, अजिंक्य तट,शिवानी भगत यांच्यासह वाचक, हितचिंतक,युवक, विद्यार्थी,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला



