संपूर्ण साक्षरताच मानवी मुल्यांची जपणूक करेल – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड

केज/ प्रतिनिधी
दिनांक ०८ सप्टेंबर २०२५ रोजी स्वानंद सार्वजनिक वाचनालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने व्याख्यान कार्यक्रम घेण्यातआला. व्याख्याते म्हणून ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.
संपूर्ण साक्षरताच मानवी मुल्यांची जपणूक करेल असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.संपूर्ण जगातील संपूर्ण मानवी समाज १००% साक्षर झाली पाहिजे.साक्षरता हिच खरी मानवी शक्ती आणि ताकद आहे. म्हणून संपूर्ण विश्वातील मानवी समुह १०० % साक्षर झाला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने कामाच्या वाचना बरोबरच सार्वजनिक गंथालयातील ग्रंथांचे अवांतर वाचनही केले पाहिजे असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून रावसाहेब जाधव, नारायणभाऊ गायकवाड,अरुण गायकवाड,रविंद्र गायकवाड पेंटर,बबन पुंड यांची उपस्थिती होती.यावेळी कृष्णा गायकवाड,विजय गायकवाड,एस.के. वैरागे,दादासाहेब गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,शिवम गायकवाड,संजय सोनवणे यांच्यासह वाचक,हितचिंतक यांची उपस्थिती होती.
दिनांक ५ सप्टेंबर २०२ ५ रोजी शिक्षक दिन अर्थात डॉ.सर्वोपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेलापुष्पहार अर्पन करून वंदन करण्यात आले.अत्यंत साधेपणाने शिक्षकदिन साजरा करण्यात आला. दोन्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन,आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे विश्वस्त आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



