महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केजच्या वतीने महात्मा फुले युवा दल केज तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विश्वास राऊत यांचा सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केज यांच्या वतीने महात्मा फुले युवा दल केज तालुकाध्यक्षपदी पत्रकार विश्वास राऊत यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वास राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत पाटील,विजय बिक्कड, प्रदीप गायकवाड, नंदकिशोर मिसाळ, पांडुरंग कसबे,अशोक नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून विश्वास राऊत यांच्या सामाजिककार्याचा गौरव करत,महात्मा फुले युवा दलाच्या माध्यमातून युवकांना संघटित करून समाजहिताचे कार्यअधिक प्रभावीपणे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की, महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विश्वास राऊत यांच्या नेतृत्वाखाली केज तालुक्यात युवा दल अधिक सक्रिय व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
या शुभेच्छा कार्यक्रमाचे सूत्र संचालन पांडुरंग कसबे यांनी केले,तर कार्यक्रमाच्या शेवटी नंदकिशोर मिसाळ यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार बांधव व सर्व उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



