सामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केजच्या सदस्यपदी अशोक नागरगोजे यांची निवड

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सर,प्रदेश संघटक वैभव स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केज यांच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात पत्रकार अशोक नागरगोजे यांची संघाच्या सदस्यपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली.

पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याने केज तालुक्यातील पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते.कार्यक्रमास सचिव विजय बिक्कड, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,कार्याध्यक्ष नंदू मिसाळ,पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष विश्वास राऊत, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग कसबे यांच्यासह अनेक ज्येष्ठ व युवा पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या भाषणातून पत्रकार संघटनेचे सामाजिक व व्यवसायीक महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारांवर होणारे हल्ले, त्याविरोधात संघटनेची भूमिका,पत्रकारांच्या विविध समस्या तसेच त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी सातत्याने लढा देण्यात येईल,असा ठाम विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंदकिशोर मिसाळ यांनी केले.त्यांनी संघटनेची स्थापना,ध्येय-धोरणे व आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत नव्याने सदस्य झालेल्या अशोक नागरगोजे यांनी संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी एकजुटीने व निर्भीडपणे काम करण्याचे आवाहन केले.पत्रकारांचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्या साठी संघटना कटिबद्ध असून,प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी संघटना खंबीर पणे उभी राहील,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग कसबे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.अशोक नागरगोजे यांच्या निवडी मुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केजचे कार्य अधिक सक्षम व बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!