न्यायालयीनसामाजिक

ॲड.स्नेहल पाटील आॕल इंडिया बार एक्झामिनेशन परिक्षा उत्तीर्ण,कायदा व्यवसायाला केली दमदार सुरुवात,सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव 

केज/प्रतिनिधी

ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (एआयबीइ-२०) परिक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रीत्या उत्तीर्ण झालेल्या ॲड.स्नेहल चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे कायदा व्यवसायास सुरुवात केली आहे.महाराष्ट्र बार कौन्सिल कडून नोंदणीकृत वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाल्या नंतर त्यांनी न्यायालयीन प्रॅक्टिस सुरू केली आहे.

कायद्याचे ज्ञान,अद्ययावत न्यायनिर्णयांचा अभ्यास आणि सर्व सामान्य नागरिकांना न्यायमिळवून देण्याची तळमळ या जोरावर ॲड.स्नेहल पाटील या कायदा क्षेत्रात विश्वासार्ह नाव करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दिवाणी व फौजदारी प्रकरणे,कौटुंबिक वाद, दस्तऐवज लेखन तसेच कायदेशीर सल्ला या विषयांमध्ये त्या कार्यरत राहणार आहेत.भारतीय

न्यायप्रणाली ही समाजाचा कणा असून प्रत्येक नागरिकाला योग्य मार्गदर्शन व कायदेशीर संरक्षण मिळावे,या उद्देशाने ॲड.स्नेहल पाटील यांनी आपल्या प्रॅक्टिसची सुरुवात केली आहे.सामान्य नागरिक, महिला,शेतकरी व गरजू घटकांसाठी कायदेशीर सल्ला सहज व परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

या नव्या वाटचालीबद्दल त्यांचे कुटुंबीय,पत्रकार बांधव, हितचिंतक व कायदा क्षेत्रातील ज्येष्ठ वकिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून भविष्यात त्या न्यायदानाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अॕड. स्नेहल पाटील या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज चे अध्यक्ष पत्रकार चंद्रकांत पाटील व ज्योती पाटील यांच्या  कन्या आहेत. सर्वांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!