सामाजिकसांस्कृतीक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या – आनंद भैय्या गायकवाड 

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालीका दिन व महिला मुक्ती दिन व्याख्यान,वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन कार्यक्रम घेवून संपन्न झाली.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.

प्रमुख व्याख्याते म्हणून ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड,बद्रीका गायकवाड,मधुरा तट यांचीथोडक्यात व्याख्याने झाली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री – शिक्षणाच्या व स्त्री मुक्तीच्या प्रणेत्या होत असे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी व्याख्यान देताना प्रतिपादन केले.वेदिका गायकवाड,मधुरा तट यांचीही थोडक्यात व्याख्याने झाली.त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत मधुरा तट,वेदिका गायकवाड, कल्याणी भोगजकर, कल्याणी घोगले,दिव्या साबळे,लक्ष्मी पुंड यांनी सहभाग घेतला.त्यानंतर कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत दादासाहेब गायकवाड, रामराव गायकवाड, रामचंद्र नांदे,माणिकराव गायकवाड,बबन पुंड, नारायणभाऊ गायकवाड, यांनी सहभाग घेवून कथाकथन केले.प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब गायकवाड,एस.के.वैरागे, वैजनाथ गायकवाड,माजी सरपंच रामराजे गायकवाड,रमेशराव गायकवाड यांचीउपस्थिती होती.सर्व कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य कर्तत्वा मुळे व आदर्शा मुळेच आज महिला मुली शिक्षण घेत आहे व समाजाच्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.मोठ्या संख्येने बालिका,बालक,विद्यार्थी, युवक,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!