शैक्षणिकसामाजिक

राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी, शाळा छोट्या सावित्रींनी गजबजली

केज/प्रतिनिधी

स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.होत्या,तर प्रमुख वक्ते म्हणून शाळेतील शिक्षिका श्रीमती अनिता जाधव व श्रीमती ध्वजा गायकवाड यांची उपस्थिती होती.

तसेच विचार मंचावर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी.यादव यांचीही उपस्थिती होती.ज्या माउली मुळे लेकींना शिक्षणाची दारे खुली झाली,त्या सावित्रीबाई फुले यांना शाळेतील मुलींनी त्यांच्याप्रमाणेच वेशभूषा करूनअभिवादन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.यांनी प्रतिमा पूजन केले.

कार्यक्रमा निमित्त आयोजित भाषणात शाळेतील छोट्या ‘सावित्री’ म्हणजेच विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व आपलेमनोगत व्यक्त केले.प्रमुख वक्त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यां समोर मांडला.प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाला सकारात्मक दिशेने नेण्यासाठी सावित्रीबाईंचे योगदान त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणकरताना श्रीमती चाटे म्हणाल्या की,सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत,त्यांना सक्षम व धाडसी करण्या साठी विविध रुढी- परंपरांचा नायनाट करण्याचे कामही त्यांनी केले.

सकाळी रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने आयोजित प्रभात फेरी मध्येही शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शाळेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस.क्षीरसागर व ए.डी.देशमुख यांनी केले, आभार जे.आर.मस्के यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी.बी. डीरंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!