केज बसस्थानकात अक्षर सेवाभावी संस्था व शिक्षक मित्र परिवारा कडून पाणपोई चे लोकार्पण,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सामाजिक उपक्रम

केज/प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची नुकतीच साजरी झालेली जयंती व काल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून बसस्थानक केज येथे अक्षर सेवाभावी संस्था व मित्रपरिवार यांच्या वतीने थंडगार जार पाणपोई सुरू करण्यात आली. तिला पाच वर्षापासून ही परंपरा अखंडित सुरू आहे.केज पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री. स्वनिल उनवणे,एस टी आगारप्रमुख श्री.चौरे, केज गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून थंडगार जार पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी,पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे म्हणाले की,उन्हाची वाढती तीव्रता या अनुशंगाने पाणपोईचे महत्व विशद केले तर केज गटशिक्षण कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दत्तात्रय चाटे यांनी खेड्यापाड्यातील सर्व सामान्य प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यामुळे अक्षर परिवार,व शिक्षक मित्र परिवार यांचे कौतूक केले. कार्यक्रमास संजय चवरे,जी.बी गदळे, आश्रुबा सोनवणे,सर्वज्ञ ॲकडमीचे संचालक दत्तात्रय बांगर,जनार्धन सोनवणे,विवेक ढोकर, बाळासाहेब देशमुख, सतीश देशमुख,गणेश नांदे, बळीराम जाधव, बाळासाहेब बचुटे, जयदिप देशमुख, चंद्रकांत मोरे,किशोर भालेराव,युवराज हिरवे, चैतन्य तांबवेकर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम डोईफोडे यांनी केले तर आभार व्हि.एम यादव यांनी व्यक्त केले.



