सामाजिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात महावीर जयंती,जागतिक रंगभुमी दिन,श्रीरामनवमी सांस्कृतीक कार्यक्रमाने संपन्न

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दि. ३१ मार्च २०२६ रोजी भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर अहिंसा परमो धर्म या विषयावर ग्रंथालयाचे संस्थापक, जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाजसेवक,महाराष्ट्रा तील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचेव्याख्यान झाले.

त्यानंतर घेण्यात आलेल्या परिसंवादात माजी सरपंच रामराजे गायकवाड,एस.के.वैरागे, ज्ञानेश्वरी पुंड,आनंद भैय्या गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर चर्चासत्रात वेदिका गायकवाड,बालाजी टिंगरे,श्रद्धा गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप ए.बी. गायकवाड यांनी केला. दि.२७ मार्च २०२६ रोजी जागतिक रंगभूमी दिन एकपात्री नाटिका सादरीकरण करून साजरा करण्यात आला.

वेदिका गायकवाड,श्रद्धा गायकवाड यांनी एकपात्री नाटिकेचे सुरेख सादरीकरण केले.दि.२६ मार्च २०२६ रोजी श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम श्रीराम प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!