रोहन गलांडे पाटील यांच्या आमरण उपोषणा ची दखल घेतली नाही तर एकही अधिकारी खुर्चीवर बसून देणार नाही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष- बाबुरावजी मस्के

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अतिक्रमणे हटविण्या साठी रोहन गलांडे पाटील दि.१७ डिसेंबर रोजी आमरण उपोषणाला बसले आहेत परंतु केज तहसीलदार प्रशासन राजकीय दबावामुळे श्री संत नामदेव महाराज तीर्थ क्षेत्र परीसरातील व छत्रपती संभाजीराजे चौक नागबेट वस्ती येथुन ते श्रीसंत नामदेव महाराज सभागृह रोडचे अतिक्रमण हटविण्या साठी ११ दिवस झाले आमरण उपोषणाला बसले आहेत परंतु प्रशासन अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यासाठी वेळ काढूपणा करत आहे .
तसेच पळवाट काढत आहेत व रोहन गलांडे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुरावजी मस्के यांनी अमरण उपोषणाला भेट देऊन प्रशासनाला तसेच तहसीलदार साहेब यांना दुरध्वनी द्वारे असे म्हटले आहे जर सोमवारी कार्यवाही केली नाही तर प्रशासनाचा एकही अधिकारी सोमवारी खुर्चीवर बसून देणार नाही असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुरावजी मस्के यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.



