सामाजिक

मांग वडगाव येथील ज्येष्ठ महिला काशीबाई निंगुळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मांगवडगाव येथील ज्येष्ठ महिला काशीबाई पांडुरंग निंगुळे वय ७१ वर्षे यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.कष्टाळू,मनमिळाऊ स्वभावाच्या आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या ताई म्हणून त्या परिसरात परिचित होत्या.त्यांच्या पश्चात मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे.तसेच त्या प्रदीप निंगुळे व संदीप निंगुळे यांच्या आजी होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!