केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिकशाळेची चार एक्कर जागा हस्तांतरणाचा घेतलेला ठराव तात्काळ रद्द करण्याची भाई मोहन गुंड यांची मागणी.

केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायत हद्दीतील सर्वे नंबर ७ मधील जिल्हा परिषद शाळेची चार एक्कर जमीन आपण नगर पंचायतला हस्तांतरीत करण्यासाठीचा ठराव आपण घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करुन,त्या बाबत आपण नगर पंचायतने जेथे कुठे हस्तांतरणाच्या बाबती मध्ये प्रस्ताव करून मागणी केल्या आहेत, तेथे ठराव रद्द केल्या बाबतचे पत्र नगर पंचायत ने संबंधित विभागाला देऊन ठराव रद्द केल्या बाबतचे कळवावे अशी मागणी नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी,नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या कडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.
सदरील शाळा कायमची बंद पडलेली नाही तिथे आज ही प्राथमिक शाळा चालु आहे,माध्यमिक शाळा चालु करण्या संदर्भात सर्व वरीष्ठ पातळी वर पत्र व्यवहार चालु आहेत.दि.२६ जानेवारीला माजी विद्यार्थ्यांचा मोठा मेळावा संपन्न झाला,मेळाव्यात सर्वांनी शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत,येत्या जुन मध्ये शाळा सुरू होणार आहे.
केज शहरातील नागरीक या शैक्षणिक चळवळीत सहभागी झाले आहेत, जुन मध्ये शाळा सुरू होणार आहे,त्यामुळे शहरातील लेकरांचे भाविष्य येथे घडणार आहे,नगरपंचायतने घेतलेला जमीन हस्तांतराचा ठराव तात्काळ रद्द करावा अशी विनंती करत ठराव रद्द न केल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात शेकाप नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे, निवेदनाच्या प्रति बीड जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही पाठवण्यात आल्या आहेत.



