देगलुरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांना दै.लोकनेताचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर,देगलुर च्या बसस्थानकाच्या बांधकामासाठी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन मिळवला होता विजय

देगलुर/प्रतिनीधी
देगलुरच्या मोडकळीस आलेल्या जुन्या बस स्थानकाच्या बांधकामाला विलंब होत असल्या बाबत उच्च न्यायालयात धाव घेऊन बांधकामाला सुरवात करुन देणारे, देगलुरच्या शासकिय पशुवैद्यकिय दवाखान्याला डबक्याचे स्वरुप आले असता प्रशासनास नविन इमारत बांधकाम करण्यास भाग पाडणारे,देगलुरातील खासगी दवाखान्यात होणारी रुग्णाच्या लुटी बाबत दरपत्रक लावण्या बाबत भाग पाडणारे असे अनेक प्रश्न मार्गी लावणारे देगलुरच्या समाजकारणात ज्यांच्या सामाजिक कार्याबद्दल ओळख निर्माण केलेले सामाजिक कार्यकर्ते यांना यंदाचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरात कार्यरत असलेल्या दैनिक लोकनेता या वृत्तपत्राच्या वतीने हा पुरस्कारघोषित करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल देगलुरातील सामाजिक, राजकिय, आरोग्य,विधी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना फोन वरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी हे मागील पंधरा वर्षा पासुन सामाजिक क्षेत्रात कार्याची सुरुवात केली असुन त्यांनी देगलुरच्या विविध प्रश्नावर आवाज उठवला असुन अनेक प्रकरणाचा त्यांनी छडा लावला आहे.काम करत असताना त्यांनी नेहमीच सत्य व वस्तुनिष्ठतेला प्राधान्य दिले.त्यांच्या सामाजिक कार्याची वैशिष्ट्ये म्हणजे निर्भीड मांडणी,निःपक्ष भूमिका आणि समाजातील वंचित,पीडित व शोषित घटकांचे प्रश्न ठळकपणे मांडण्याची जिद्द गेल्या काही वर्षांत त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्या लेखनीतुन पुढे आणले. त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरावर घेतली जात आहे.
धनाजी जोशी यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.दैनिक लोकनेता वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या १० मे रोजी जीव्हीटी कृषीकुल, शिरसाळा जि.बीड येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत धनाजी जोशी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर धनाजी जोशी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून,सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले जात आहे.



