सामाजिक

गप्पेवाडी-नामेवाडी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती अनोख्या उपक्रमाने साजरी,सरपंच बाळासाहेब केदार यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना केले शालेय साहित्य वाटप

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील गप्पेवाडी-नामेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब केदार यांच्या पुढाकारातून लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती गावातील हनुमान मंदिर येथील सभागृहात ऊस तोड कामगारांच्या गरजू मुलांसाठी शालेय गणवेश व टिफिन बॅग तसेच खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी याकार्यक्रमात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित उत्कृष्ट भाषणे केले.मुंडे साहेबांचे विचार हे समाजातील नव्या पिढीपर्यंत आपण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविले पाहिजेत,असे मत सरपंच बाळासाहेब केदार यांनी बोलताना व्यक्त केले.या कार्यक्रमाला जि.प.प्रा. शाळा नामेवाडी, गप्पेवाडी, पिंपळ शेतवस्ती, महादेव वस्ती या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

तसेच गप्पेवाडी व नामेवाडी पंचक्रोशीतील सरपंच बाळासाहेब केदार ,पांडुरंग केदार,दिनकर केदार,चंद्रकांत केदार, हरि केदार,बालू फौजी,विष्णु केदार,अशोक केदार, सत्यप्रेम केदार,दत्ता केदार,बाबा केदार, रामहरी केदार,कृष्णा केदार,बाबुराव पाटील, चांगदेव केदार,बीभिशन केदार,नामदेव केदार, अशोक सुधाकर केदार, श्रीहरी केदार,रघुनाथ केदार,राहुल केदार,अंकुश केदार,दगडू केदार,यांच्या सह शेकडो आबाल वृद्ध उपस्थित होते.या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल,आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील तरुणांनी सहकार्य केल्याबद्दल सरपंच बाळासाहेब केदार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!