
केज/प्रतिनिधी

मराठा सेवा संघाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम केज येथे गट शिक्षणाधिकारी कार्यालय सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणुन केजचे तहसीलदार राकेश गिड्डे, जी.बी. गदळे सर हे लाभले होते. शिक्षकांच्या योगदानाचे मूल्य अधोरेखित करण्या साठी,तसेच त्यांच्या कार्याचा समाजमान्य गौरव व्हावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली तहसीलदार राकेश गिड्डे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,मी स्पर्धा परीक्षा देऊन पहिल्या प्रयत्नातच तहसीलदार हे पद मिळवले.माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच पुर्ण झाले सध्या काळ बदलत आहे. शिक्षकांनी बदलत्या काळात अपडेट राहुन शालेय शिक्षणा सोबत स्पर्धा परिक्षेचे शिक्षण तसेच संगणक युगात पारंगत कसे राहता येईल याचे शिक्षण विद्यार्थांना देणे आवशक आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात एकुण सोळा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.संगीता नवले, फुलसुरे,मोहन ढाकणे, व्यंकट चव्हाण,संध्याराणी कोल्हे, सुरेखा मोराळे, नवनाथ घुगे,रेखा धेंडे, नितीन हावळे,स्वाती वरपे,बाबुराव तांबडे, बालासाहेब लोखंडे, आश्रुबा गायकवाड, पुंडलिक पोपळघाट, शामल जाधव या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी संघटनेचे पदाधिकारी नागनाथ जाधव जिल्हाध्यक्ष, म.से.सं.बीड शिवश्री डॉ. भाऊसाहेब चाळक जिल्हा उपाध्यक्ष म.से.सं. बीड,दत्तात्रय चाटे शिक्षण विस्तार अधिकारी,हनुमंत भोसले सामाजिक कार्यकर्ते,केज,हनुमंत घाडगे ज्येष्ठ साहित्यिक, केज,डॉ.हनुमंत सौदागर, जनार्धन सोनवणे ज्येष्ठ साहित्यिक केज,शिवाजी ठोंबरे जिल्हाध्यक्ष छावा संघटना,बीड भाई मोहन गुंड नेते,शेकाप केज, विनोद शिंदे जिल्हाध्यक्ष, म.से.सं,समन्वयक,बीड गोविंद नाना शिनगारे, केज,राहुल खोडसे जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड बीड यांसह विविध मान्यवर,शिक्षक व अधिकारी उपस्थीत होते.



