क्रिडाशैक्षणिकसामाजिक

साने गुरुजी निवासी विद्यालय व नरेंद्र मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्थेचे युवा महोत्सवात वर्चस्व

केज/प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध स्पर्धां मध्ये साने गुरुजी निवासी विद्यालय व नरेंद्र मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था केज यांनी सहभाग नोंदवून प्राविण्य मिळवत विभागीय स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

जिल्हास्तरीय लोकनृत्य प्रथम,लोकगीत तृतीय, कथालेखन द्वितीय, विज्ञान नवोपक्रम ट्रॕक तृतीय,तर विभाग स्तरीय लोकनृत्य प्रथम तर कु. साक्षी उद्धवराव कराड हिने लोकनृत्य प्रथम, जिल्हास्तर कथालेखन द्वितीय,वक्तृत्व द्वितीय, नवोपक्रम ट्रॕक तृतीय असे प्राविण्य मिळवत विभागीय स्तरावर मजल मारत बीड येथे दि.२४ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्यास्पर्धेत लोकनृत्य द्वितीय,कथालेखन प्रथम, वक्तृत्व द्वितीय क्रमांक पटकावत शिर्डी येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे.

सदर स्पर्धेतील लोकनृत्या चीकोरोओग्राफी कु.साक्षी कराड यांनी अतिशय उत्कृष्ट केली होती.त्या बद्दल तिचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

लोकनृत्यात सहभागी कु.साक्षी कराड,कु. प्रांजली चौरे,कु.पुजा गायके,कु.वैष्णवी विघ्ने, आकांक्षा गोने,सिद्धी सोनटक्के,पुजा मुंजाळ तर गायक कृष्णा नागरगोजे,वादक पवन चंदनशिव यांनी सहभाग नोंदवत प्राविण्य मिळवले तर लोकगीत गायन प्रांजली चौरे,पुजा गायके, कृष्णा नागरगोजे, चैत्राली धिमधिमे,पवन चंदनशिव, ओमकार पेटकर,सचिन भगाडे यांनी सहभाग नोंदवत बक्षीसाची लयलूट केली.

विभागीय स्तरावर बीडचा दबदबा कायम ठेवला यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख शेख मॅडम, कुलकर्णी मॅडम,चाटे सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.बक्षीस विजेत्या स्पर्धकांचे संस्था अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड, उपाध्यक्ष राजेश कापसे, मुख्याध्यापक प्रा.डॉ. कविता कराड मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!