
केज/प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या उसाला पाहीजे तसा भाव मिळत नसल्याने आमरण उपोषणाचा इशारा देण्यासाठी निवेदन देण्यात आले व आमरण उपोषणाचे निवेदन देताच येडेश्वरी साखर कारखाना प्रशासनाकडुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात २८०० रुपये वर्ग करण्यात आले.धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान शिव स्मारकाचे जनक बाळराजे दादा आवारे पाटील व अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ प्रदेश अध्यक्ष रोहन गलांडे पाटील मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी शेतकऱ्यांना पहिली उचल ३०००उचल देण्यात यावी व चार हजार रुपये भाव मिळावा या मागणी संदर्भात केज तहसीलदार यांच्याकडे आमरण उपोषणाचे निवेदनदेण्यात आले.
निवेदनाची दखल घेताच येडेश्वरी साखर कारखान्यानेशेतकऱ्यांच्या खात्यात २८०० रुपये वर्ग करण्यात आले.उर्वरित २०० जमा करा अन्यथा आम्हाला तीन तारखेला येडेश्वरी शुगर या कारखान्याच्या गेटवर आमरण उपोषण करावेच लागणार आहे असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव, अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.



