वाणिज्यसामाजिक

अंबाजोगाई येथे सहकारी पतसंस्था संचालक, कर्मचारी यांचा सहकार प्रशिक्षण वर्ग संपन्न. 

अंबाजोगाई/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथे नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी यांच्याकरिता दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

या उद्घाटन प्रसंगी योगेश्वरी कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित अंबाजोगाई चे चेअरमन अध्यक्ष म्हणून श्री.व्ही.के.मसने सर व प्रमुख पाहुणे म्हणून सचिव साळवे सर यांची विशेष प्रमुख उपस्थिती होती.सहकार अधिकारी श्री.विलास मोरे,व्याख्याते सहकार तज्ञ प्रमाणित लेखा परीक्षक श्री.खोडसे सी.ए हे उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी सहकार अधिकारी श्री.मोरे साहेब यांनी वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या परिपत्रकान्वये संस्थेने कामकाज व सदर परिपत्रकांची अंमल बजावणी करणे आवश्यक असुन त्या अनुषंगाने सहकारी पतसंस्थेतील कर्मचारी, संचालक यांनी वेळोवेळी सहकार प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे असा पतसंस्थेतील कर्मचारी व संचालकांना सल्ला दिला. दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात पहिल्या दिवशी सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे व उपप्राचार्य एस. आर.कोळे यांनी सहकार कायदा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच सहकार तज्ञ अभ्यासू बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहकार व्याख्याते श्री. खोडसे सी.ए प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड यांनी ठेवी सुरक्षितता,कर्ज वितरण करत असताना घ्यावयाची दक्षता, एन.पी.ए थकबाकी, थकबाकीदावर 101 ची कायदेशीर कारवाई, ऑडिट संदर्भात व भविष्यात ठेवीदार व संस्था अडचणीत येणार नाही याविषयी सविस्तर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच दुसऱ्या दिवशी सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे प्राचार्य ठोंबरे सरांनी सहकार कायदा, नियम,याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

समारोप प्रसंगी योगेश्वरी कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन वि.के.मसने सर,सहकार अधिकारी मोरे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन, आभार वर्ग संयोजक श्री.एस.आर कोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी पार पाडण्यास योगेश्वरी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई कर्मचारी,संचालक यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!