
केज/प्रतिनिधी
दि.26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज येथे भारतीय संविधाना बद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी एक भव्य आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.हा कार्यक्रम एनएसएस विभाग, राज्यशास्त्र विभाग आणि लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.माधवराव फावडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणुन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.सी.एन.सोळंके हे होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.
डॉ.सोळंके यांनी संविधान हा राष्ट्रजीवनाचा पाया असून त्याचे मनःपूर्वक अध्ययन आणि प्रत्यक्ष आचरण अत्यावश्यक असल्याचे सांगितले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.यादव जे. बी यांनी संविधान रक्षणात युवकांचीभूमिका मांडली.एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. बोबडे ए.आर यांनी सामाजिक समता, जबाबदारी आणि नागरिकत्वाचे भान या बाबतीत मार्गदर्शन केले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.गालफाडे ए.बी यांनी संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली आणि त्यातील प्रगत तत्त्वांचा अर्थ उलगडून सांगितला.लोक प्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ.बिडवे टी.एस यांनी प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांच्या सहभागाची गरज अधोरेखित केली. त्याचप्रमाणे प्रा.डॉ. सरसरे एस.एम यांनी संविधानाधिष्ठित समाज घटकांसाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक आणि जागरूक भूमिका बजावावी असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली आणि संविधानिक मूल्यांचे निष्ठेने पालन करण्याची शपथ घेतली.कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन एनएसएस स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे पार पाडले.



