जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
दि.८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिना निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत आदर्श राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,त्यागमुर्ती रमामाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रातिनिधिक स्वरूपात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शालु विजय थोरात,सौ.निर्मलामधुकर थोरात,विमल अभिमान पटेकर,फातेमा पठाण, अपग्रेड मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी केले.प्रत्येक पुरुषांनी महिलांचा आदर करुन मानसन्मान केला पाहिजे असे कर्तृत्ववान आदर्श राजमाताजिजाऊ मॉंसाहेब,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमुर्ती रमामाई आंबेडकर अशा अनेक महिलांनी कर्तृत्व केले. थोर पुरुषांना स्त्रियांनी त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांसाठी कार्य केले.महात्मा फुलेंची समाज उन्नतीसाठी कार्य केले.अशा अनेक थोर महापुरुषांना त्यांच्या कार्यास महिलांनी साथ दिली.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. प्राथमिक पदवीधर डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर,गणित विज्ञान विषयाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर, श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनी जागतिक महिला दिना निमित्त सविस्तर माहिती दिली.
गावातील कर्तृत्ववान,आदर्श महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.संगीत खुर्ची,गीत गायन,उखाणे, बेटी बचाव बेटी पढाओ असे विविध उपक्रम शाळेत घेण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक शपथ घेऊन बालविवाह प्रतिबंधक बाबत सविस्तर माहिती दिली. अल्पोपहार व चहापाणी देऊन श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आदर्श शिक्षक श्री. आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी केले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शालु विजय थोरात,सौ.निर्मलामधुकर थोरात,सौ.सुवर्णमाला नानासाहेब पवार,सौ. अनिता सिध्देश्वर पवार, सौ.नंदिनी अविनाश थोरात,राधा संतोष ढोरे, विमल अभिमान पटेकर, फातेमा पठाण,मिरा सुरेश थोरात,अंगणवाडी ताई उषाताई थोरात, मदतनीस,पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार,गावातील बचत गट महिला,विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.



