वाणिज्य

अंबाजोगाई येथे पतसंस्था संचालक, कर्मचारी प्रशिक्षण संपन्न

अंबाजोगाई/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म पुणे,मा.जिल्हा उप निबंधक,सहकारी संस्था बीड,सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांच्या वतीने अंबाजोगाई येथे दोन दिवसीय पतसंस्था संचालक,कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले.

सदर प्रशिक्षणात जे.एस.शर्मा वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक,अंबाजोगाई सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे उप प्राचार्य एस.आर.कोळे,आधार मल्टी स्टेट पतसंस्थेचे संस्थापक सुनिल सौंदरमल,सी.ए.खोडसे प्रमाणीत लेखा परीक्षक सहकारी संस्था बीड यांनी योग्य कर्ज वाटप, वसूली संबंधी कायद्या तील तरतुदी,नियामक मंडळ,व्यवसाय वाढ, सहकार कायद्यातील महत्वाच्या तरतुदी, पतसंस्था ऑडिट गुण निकष,उपविधीदुरूस्ती, नफा विभागणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचलन व आभार प्रदर्शन वर्ग संयोजक एस.आर.कोळे उप प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!