
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड यांच्यावतीने दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरु तेगबहादूर शहीद दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गुरू तेगबहादूर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन वंदन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब जाधव, संजय सोनवणे,सिंधु आदमाने,संभाजी लवटे, अरुण गायकवाड,यशवंत सौदागर,सुशांत सौदागर, कृष्णा गव्हाणे,विराज राऊत,नितीन गव्हाणे, रविंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी गुरु तेग बहादूर यांचा जीवन – परिचय मांडला. यावेळी संजय सोनवणे, रावसाहेब जाधव,सिंधु आदमाने, यशवंत सौदागर, अर्जुन साबळे यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप रामराजे गायकवाड यांनी केला.
दि.१९ नोव्हेंबर २०२५ रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भारतरत्न इंदिरा गांधी व झाशीची राणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.
ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांचेछोटेखानी व्याख्यान झाले.आपल्या व्याख्यानात आयर्न लेडी भारतरत्न इंदिरा गांधी व महानयोद्धा झाशीचीराणी यांची जीवनगाथा यासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून अरुण गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, एस.के.वैरागे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते,प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.कार्यक्रमाला वाचक, हितचिंतक, विद्यार्थी,युवक,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.



