बीड जिल्हा सहकार बोर्डाचे कार्य सर्वोत्कृष्ट – प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुंबई येथील वसंत दादा पाटील सभागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त 72 व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहा निमित्त मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुंबई व मुंबई जिल्हा सहकार बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील विभागीय सह मंडळ जिल्हा सहकार बोर्ड अधिकारी व पदाधिकारी चर्चासत्र मुंबई या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकार संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकार संघाचे अध्यक्ष प्रवीणजी दरेकर हे होते तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री.राहुलजी नार्वेकर हे होते .
या कार्यक्रमांमध्ये तीन शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये बीड जिल्हा सहकार बोर्डाचे कार्य हे उत्कृष्ट असल्यामुळे बीड जिल्हा सहकार बोर्डाला देखील सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे व सहकार विकास अधिकारी राम वाघमारे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पूर्ण महाराष्ट्रातील सहकार बोर्डाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सहकार अधिकारी उपस्थित होते मुंबई जिल्हा सहकार बोर्डाने व जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले व कार्यक्रम योग्य रित्या पार पाडला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंबई जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष यांनी आभार मानले व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.



