वंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष पत्रकार बाबासाहेब मस्के यांची सुजात (दादा) आंबेडकर यांनी घेतली सदिच्छा भेट

केज/प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तसेच रोखठोक न्यूजचे संपादक बाबासाहेब मस्के यांच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून सध्या ते उपचार घेत आहेत.त्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्या साठी व त्यांना मनोबल देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात (दादा) आंबेडकर यांनी अंबाजोगाई येथे त्यांच्या राहत्या घरी भेट दिली.
या भेटीदरम्यान सुजात दादांनी मस्के यांची तब्येत जाणून घेतली,त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण प्रकृतीस सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच पक्षाच्या व वैयक्तिक पातळीवरील सर्व सहकार्याची हमीही दिली.
बाबासाहेब मस्के हे पत्रकारितेसोबतच सामाजिक प्रश्नांवर रोखठोक भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात.त्यांच्या प्रकृती बाबत पक्षातील कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातही चिंता व्यक्त होत होती.सुजात आंबेडकर यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याचे वातावरण दिसून आले.बाबासाहेब मस्के यांनीही या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले असून,लवकरच पूर्ववत कार्यरत होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी विविध स्तरांवरून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.यावेळी बाबासाहेब मस्के यांच्या पत्नी यावेळी उपस्थित होत्या.त्यांना सुजात दादा यांनी धीर देत काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे.



