छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य,शौर्य, पराक्रम व परधर्म सहिष्णुता समाजाचे प्रेरणास्त्रोत आहे – आनंद भैय्या गायकवाड

केज/ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य,शौर्य, पराक्रम व परधर्म सहिष्णुता समाजाचे प्रेरणास्त्रोत आहे असे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.ते दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त व्याख्यान देताना बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त व्याख्यान, भाषण स्पर्धा,गीतगायन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.
आनंद भैय्या गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.तर भाषण स्पर्धेत प्रथम – नंदिता नरेंद्र गायकवाड, द्वितीय – वेदिका डिगांबर गायकवाड,तृतीय -नम्रता नरेंद्र गायकवाड यांनी प्राविण्य मिळविले.गीत गायन स्पर्धेत प्रथम – वेदिका दिगांबर गायकवाड,द्वितीय – नम्रता नरेंद्र गायकवाड, तृतीय – अजिंक्य कृष्णा तट यांनी प्राविण्य मिळविले.विजयी स्पर्धकांना ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानीत करणात आले.भाषण स्पर्धेत ९ व गीतगायन स्पर्धेत ही ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड,दादासाहेब गायकवाड,नारायण भाऊ गायकवाड,ए.बी. गायकवाड यांची उपस्थिती होती.एकपात्री नाटकाचे प्रयोगही विद्यार्थ्यांनी केले. अध्यक्षीय समारोप डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, वाचक उपस्थित होते.



