जि.प.प्रा.शाळा डोंगरपिंपळा शाळेत आनंदनगरी मेळावा उत्साहात संपन्न, चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने

अंबाजोगाई/प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक डोंगरपिंपळा शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यवहारिक गणिताचे धडे मिळावेत या उद्देशाने आनंदनगरी (बाल आनंद मेळावा) मोठ्या उत्साहात पार पडला.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या आणि खेळण्यांच्या स्टॉल्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.उमाकांत राख आणि सरपंच श्री.भास्कर आबा पवार, प्रमुख पाहुणे श्री.रापतवार सर,ग्रामस्थ आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना मुख्याध्यापक यांनी सांगितले की,केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे,यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.तसेच प्रमुख पाहुणे श्री.रापतवार सरांनी बोलताना सांगितले की,या मेळाव्या च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नफा-तोटा, खरेदी-विक्री आणि बचतीचे महत्त्व समजले.
पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमामुळे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले.शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ,घरगुती खाद्यपदार्थ,भाजीपाला आणि खेळण्यांचे छोटेखानी दुकान थाटले होते.भेळ,वडापाव, सँडविच आणि लिंबू सरबत अशा विविध स्टॉल्सवर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे,चिल्लर पैशांचा हिशोब आणि ग्राहकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाखाणण्या सारखा होता.
यावेळी पुढील मान्यवर उपस्थित होते.श्री.उमाकांत राख शालेय समिती अध्यक्ष, संस्थापक व अध्यक्ष श्री.रापतवार सर शिक्षण मैत्रीप्रतिष्ठान,अंबाजोगाई श्री.राठोड साहेब केंद्र प्रमुख भावठाणा,श्री. नेरकर साहेब,विषयतज्ञ श्री.भास्कर आबा पवार सरपंच,डोंगरपिंपळा श्री. धनराज केंद्रे उप सरपंच डोंगरपिंपळा,संत भगवान बाबा विद्यालय डोंगरपिंपळा,ढगे सर मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व विद्यार्थी,श्री.रामचंद्र पवार,व श्री.हनुमंत शेप, शालेय समिती सदस्य, श्री.सहदेव पवार, श्री.रामचंद्र शेप,गोविंद केंद्रे श्रीमती ज्योती राख, श्रीमती वैष्णवी केंद्रे, श्रीमती अश्विनी कसबे, श्रीमती राजश्री कसबे, श्रीमती मंजुषा पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरपिंपळा मुख्याध्यापक कोरटवाड सर,श्रीमती कापसे कमल कचरू,श्री.माने सुधीर शिवाजीराव,श्री.पोटलावर कृष्णा हुल्लाजी, श्री.पोपलघट अशोक सूर्यकांत, श्री. कचकलवार संजय हणमंतराव,श्री. राठोड बाळासाहेब भिल्लू शिक्षक वृंद व वरील सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याच्या सांगता वेळी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शेवटी राठोड सर यांनी सर्वांचे आभार मानले.



