प्रशासकीयसामाजिक

बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उस्फुर्त प्रतिसाद वैभव स्वामी यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण 

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका, पतसंस्था संचालक, कर्मचारी यांच्या करीता विशेष वसूली अधिकारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.बबनराव आंधळे यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने संपन्न झाले.

तीन दिवसीय प्रशिक्षणात जिल्हा उपनिबंधक एस.एम. तोटावर,सहाय्यक निबंधक अशोक कदम, आर.एस.बोडखे वसुली अधिकारी अकोला, एन. एन.कुलकर्णी वसुली अधिकारी सोलापूर,आदेश नहार सी.ए.बीड,प्राचार्य डॉ. मन्मथ हेरकर,सी.ए. खोडसे प्रमाणित लेखा परीक्षक बीड ,सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे उपप्राचार्य एस.आर. कोळे यांनी सहकार आयुक्त यांनी दिलेल्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन केले.समारोप समारंभाच्या अध्यक्ष स्थानी बीड जिल्हा सहकारी बोर्डाच्या संचालिका प्रा.सुशिला ताई मोराळे,प्रमुख पाहुणे वैभव स्वामी, पत्रकार तथा संपादक दैनिक समर्थ राजयोग बीड यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन,आभार प्रदर्शन वर्ग संयोजक एस.आर.कोळे उप प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात व यशस्वी पार पडण्यास बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. प्रशिक्षण वर्गास बीड जिल्हा सहकारी बोर्डाचे उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!