
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू जयंती अर्थात बालदिन बालग्रंथ प्रदर्शन,बाल ग्रंथवाचन, व्याख्यान,बाल मेळावा आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बालगोपालांच्या हस्ते पुजन व वंदन करण्यात आले.सर्वप्रथम बाल वाचकांसाठी सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळात आयोजित केलेल्या बालग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
सकाळी ९ ते १० या वेळात बाल वाचकांनी ग्रंथवाचन केले.त्यानंतर बालमेळावा घेण्यात आला.या बालमेळाव्यात अंगणवाडी कार्यकर्ती सौ.जयश्री सिताराम वैरागे, मदतनीस सौ.शिवकन्या गायकवाड, संजय सोनवणे,आनंद भैय्या गायकवाड,रविंद्र गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मार्गदर्शन करताना अंगणवाडी कार्यकर्ती सौ.जयश्री वैरागे यांनी बालक-बालिका यांना वाचनाचे वेड लागावे अशी भावना व्यक्तकरून स्वानंद सार्वजनिक वाचनालयात बाल साहित्याचा खजिना असून बाल वाचकांनी नियमित वाचन करावे असे आवाहन केले.तसेच स्वानंद सार्वजनिक वाचनालय नियमितपणे बालवाचक, वाचकांना प्रोत्साहन देत आहे तसेच मोफत वाचन सेवा देत आहे, यामुळे बालवाचक, विद्यार्थी, युवक,जेष्ठ नागरिक,महिला म्हणजेच गांवातील सर्व घटकां साठी,लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच मोफत सेवा देत आहे,ही गांवाच्या सर्वांगीण विकासाला चालनादेणारी बाब असल्याचे प्रतिपादन केले.
प्रत्येक घटकातील वाचकांचा बौद्धीक, मानसीक विकास व्हावा ज्यामुळे शारीरीक, आर्थिक,सांस्कृतिक विकास होईल यासाठी १९९७ पासून ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे वाचक सभासदाकडून एक रुपाचीही फीस न घेता, स्वतः सर्व वाचकांची वार्षीक वर्गणी भरून वाचक मोफतसेवा देतात. याचा जास्तीत जास्त वाचकांनी कायदा घ्यावा असे आवाहन या बाल मेळाव्यात सौ.जयश्री सिताराम वैरागे यांनी केले.यावेळी शिवकन्या गायकवाड, निलावती पोळ,संजय सोनवणे, रविंद्र गायकवाड, आनंद भैय्या गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
बालग्रंथ वाचन,बालग्रंथ प्रदर्शन व बाल मेळावा कार्यक्रमात कु.महेश्वरी महेश गायकवाड, समिक्षा सतीश गायकवाड, शिवानी सतीश गायकवाड,स्वरा निलेश गायकवाड,दिग्विजय रामेश्वर.गायकवाड,श्रीपदा संतोष गायकवाड,वेदिका भारत घोगले,धनश्री बालाजी गायकवाड,श्रेया दत्तात्रय गायकवाड,गुरु प्रसाद अमोल गायकवाड, जान्हवी दिपक पुरी, शिवमल्हार कृष्णा गायकवाड यांनी ग्रंथ प्रदर्शन,बाल ग्रंथवाचन, बालमेळावा आदी सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.
त्यानंतर ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांचे छोटेखानी व्याख्यान झाले.त्यांनी बालकांचे चाचा नेहरू यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला.तसेच बाल वाचकांना बालपणापासून वाचनाची सवय लागावी म्हणून वाचाल तर वाचाल असे सांगून काहीही वाचा पण वाचा हे वाचनाची नियमीत सवय लागण्या साठी आणि आयुष्याला दिशा देण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते,प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी थोडक्यात अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन बाबासाहेब गायकवाड यांनी केले.



