सामाजिकसांस्कृतीक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात वंदे मातरम सामुहिक गीत गायन व व्याख्यान कार्यक्रम संपन्न.

केज/ प्रतिनिधी

दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल वंदे मातरम हे गीत सामुहिक गायन करण्यात आले.या सामुहिक वंदे मातरम गायनासाठी आनंदगांव ता.केज जि.बीड येथील ग्रामस्थ,वाचक,हितचिंतक,विद्यार्थी,जेष्ठ नागरीक, युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती व सहभाग होता.

यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न आले.अध्यक्षस्थानी शिवदास अप्पा गायकवाड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, राजाभाऊ बोडखे, शिवाजी घोगले,वामन गायकवाड,दादासाहेब गायकवाड यांचीउपस्थिती होती.

डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी वंदे मातरम गीताच्या निर्मीती संबंधी सविस्तर विवेचन करून बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले गीत प्रथम रविंद्रनाथ टागोर यांनी गायल्याचे सांगून स्वातंत्र संग्रामासाठी हे गीत प्रेरणादायी ठरल्याचे प्रतिपादन केले.या वंदे मातरम गीताचे पाळेमुळे जनतेत एवढी खोलवर रुजली कि,पुढे चालून हे गीत स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्त्रोत बनल्याचे प्रतिपादन डॉ.वसुदेवबप्पा गायकवाड यांनी केले.

यानंतर दादासाहेब गायकवाड,राजाभाऊ बोडखे,माजी सरपंच रामराजे गायकवाड, शिवाजी घोगले,वामन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप शिवदास अप्पा गायकवाड यांनी केला.

कार्यक्रमाला गणपती गायकवाड,रामकिसन गायकवाड,सुखदेव गायकवाड,गोरक्षनाथ पुरी,रामचंद्र नांदे, रावसाहेब गायकवाड, नारायण गायकवाड,एस. के.वैरागे,संजय सोनवणे यांच्यासह वाचक,हित चिंतक,विद्यार्थी, युवक, जेष्ठ नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती व सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!