
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सर्व गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पिकांची पुर्णपणे नासधूस होऊन पिक कुजले आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव यांच्या सह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांना निवेदन देत ओला दुष्काळ त्वरित जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,केज तालुक्यातील सर्वच भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापूस,सोयाबीन,तूर यांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर उपासमारी ची वेळ आली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदना वर बाळासाहेब देशमुख,अप्पा कांबळे, अंगद देशमुख,पप्पू कोल्हे,शिवसेना शहर उप प्रमुख,सुधीर जाधव तालुका संघटक,पिंटु शिंदे,अनिकेत शिंदे, अरुण देशमुख यांच्या सह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. शेतकरी संकटात सापडलेल्या या कठीण काळात शासनाने तत्परतेने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



